पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांच्या विमानांतून प्रवास करू नका ! – संयुक्त राष्ट्रांची त्यांच्या कर्मचार्‍यांना सूचना

आतंकवादी देश असणार्‍या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !

वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने जगातील २६० पेक्षा अधिक विमानतळ बुडण्याचा धोका !

जगातील तापमान वाढण्याला विज्ञान उत्तरदायी आहे, हे तथाकथित बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी कधीही मान्य करणार नाहीत; मात्र तिच वस्तूस्थिती आहे !

देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी गोव्यात यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांना गोव्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी निमंत्रित करत आहे. ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवापेक्षा अधिक चांगल्या रितीने साजरा केला जाणार आहे.

राजस्थानमध्ये चोरट्यांनी २ दिवसांत २ ठिकाणी एटीएम् यंत्र चोरून नेले !  

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !

खोटे घरक्रमांक देणार्‍यांवर कारवाई न केल्याप्रकरणी देवबागचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश कद्रेकर यांचे उद्यापासून आमरण उपोषण

ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीच्या गोपनीय धारिकांमधील तपशील सरकारने घोषित करावा ! – भारत रक्ष मंचची ओडिशा सरकारकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या घडामोडीशी निगडित ही माहिती बिजू जनता दलाने स्वतःहून उघड करणे आवश्यक आहे !

पुण्यातील हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकने मलेशियामध्ये जप्त केलेल्या विमानाच्या भाड्याची ५१ कोटी रुपये रक्कम फेडली !

मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले.

पुण्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू होणार

शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कळंगुट येथे २ ठिकाणी अमली पदार्थ जप्त

पहिल्या प्रकरणात खेड, रत्नागिरी येथील  एका २१ वर्षीय युवकाकडून १ किलो २०० ग्रॅम (किंमत सुमारे १ लाख २० सहस्र रुपये) वजनाचे अमली पदार्थ, तर दुसर्‍या प्रकरणात पश्‍चिम बंगाल येथील १९ वर्षीय शब्बीर अली खान याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा गांजा कह्यात घेण्यात आला आहे.