बंगालमध्ये भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक

बंगालमधील अशा प्रकारचा हिंसाचार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी बंगाली जनता निवडणुकीद्वारे प्रयत्न करणार का ?

आता रेल्वेमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग बंद !

रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करतांना भ्रमणभाष संच, लॅपटॉप आदी भारित (चार्जिंग) करता येणार नाहीत. रात्री ११ ते पहाटे ५ या काळात रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

ऐरोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या ए.टी.एम् यंत्राला आग !

आगीचे कारण समजू शकले नाही; मात्र तेथील वातानुकूलन यंत्रातील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशमन दलाला बोलवावे लागले.

पुढील काळ कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे ! – डॉ. चौधरी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ६ लाख ३० सहस्र नागरिक असून या सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच. मास्क न वापरणार्‍या आणि कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर मार्चअखेर ४० लाख ९० सहस्र रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

पुणे येथील रुग्णांना लुबाडणार्‍या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची चेतावणी !

खासगी रुग्णालयांमध्ये विमाधारक मध्यम लक्षणे असणार्‍या रुग्णांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत.

राज्यात तूर्तास दळणवळण बंदीचा निर्णय नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात २ एप्रिलनंतर दळणवळण बंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी फेटाळून लावली.

दळणवळण बंदीच्या निर्बंधामुळे रिक्शा व्यावसायिक संतप्त !

निवेदनामध्ये म्हटले आहे की, रिक्शाच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्यात येऊ नये, नोंदणी आणि ‘फिटनेस’ शुल्क आकारणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा ५० रुपये दंड मागे घेण्यात यावा, रिक्शासाठी स्वतंत्र विमा गट करण्यात यावा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप !

पीडित महिलेची तृप्ती देसाईंसह पुण्यात पत्रकार परिषद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १ ते ५ एप्रिल या काळात श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावर प्रवेशबंदी

मंदिर संस्थानच्या वतीने याची माहिती देण्यात आली. मंदिर, तसेच गड येथे प्रवेश बंद असला, तरीही श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा आणि आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक चालू असेल.

वणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या संसर्गात वाढ !

पिंपळगाव, भालर, बोर्डा, कुरई, गणेशपूर या गावांत अधिक प्रमाणात, तर अन्य गावांमध्ये अत्यल्प अशी कोरोनाची स्थिती आहे.