पुणे येथील रुग्णांना लुबाडणार्‍या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची चेतावणी !

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे, १ एप्रिल – खासगी रुग्णालयांमध्ये विमाधारक मध्यम लक्षणे असणार्‍या रुग्णांना १० दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असणार्‍या कोरोनाबाधितांना दहाव्या दिवशी घरी पाठवण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे; मात्र खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांना आणि विशेषत: विमा पॉलिसी असणार्‍या रुग्णांना १० दिवसांत घरी पाठवले जात नाही. त्याशिवाय या रुग्णांना पुन्हा ‘आर्.पी.टी.सी.आर्.’ चाचणी करण्याचा आग्रह धरण्यात येतो. हा एकप्रकारे रुग्णांना लुटण्याचाच प्रकार आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची चेतावणी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली आहे.