स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा ! –  कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती

कोल्हापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर – आज बंगालमध्ये भयावह स्थिती आहे. तेथील हिंदु युवती आणि महिला यांच्यावरही अत्याचार होत आहेत. याचसमवेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी अन् येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सबळ होणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच सिद्ध व्हायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले. त्या वारणा-मलकापूर या परिसरातील धर्मप्रेमींसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या. या व्याख्यानाला १२६ धर्मप्रेमी युवक आणि युवती उपस्थित होत्या. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रेरणा मठपती हिने केले. या वेळी अनेकांनी हा कार्यक्रम आवडल्याचे सांगितले.

अभिप्राय

सोनाली पाटील – महिलांनी शौर्य जागृत कसे ठेवावे, ते शिकायला मिळाले.

अपूर्वा सिद – महिलांना काही ना काही कामाच्या निमित्ताने बाहेर जावे लागते. या प्रशिक्षणाचा उपयोग करून त्या सुरक्षित राहू शकतील.