खासगी रुग्णालयाद्वारे केला वैद्यकीय व्यवसाय !
पैशांचा इतका हव्यास कशासाठी ?
नागपूर – येथील महापालिका आरोग्य विभागातील लक्ष्मीनगर झोनच्या वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. वैशाली मोहोकर यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतांनाही खासगी रुग्णालय चालू करून वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले. या संदर्भात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले. महापालिकेकडून प्रति मास १ लाख ५० सहस्र रुपयांचे वेतन घेत असतांनाही डॉ. मोहोकर या स्वत:चे खासगी रुग्णालय चालवत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.