हिंगोली – येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड प्रभागात विनाकारण थांबून कोरोनाचा प्रसार करणार्या कोरोनाबाधित रुग्णांच्या ४० नातेवाइकांवर पोलीस ठाण्यात २४ एप्रिलच्या रात्री आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये १३ महिलांचाही समावेश आहे. ग्रामसेवक सुभाष बागुल यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंद झाले आहेत. (कोरोनाचे संकट तीव्र असल्याने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते. तरीही त्यांचे उल्लंघन करणे, हे गंभीर आहे ! – संपादक)
‘येथील शासकीय रुग्णालयाच्या कोविड प्रभागात रुग्णांसमवेत त्यांच्या नातेवाइकांनी थांबू नये’, अशी स्पष्ट सूचना लिहिलेली असतांनाही तिचे पालन होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णालयात थांबणार्या नातेवाइकांना थेट विलगीकरण कक्षात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नुकतीच त्यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली, तेव्हा ३५ हून अधिक नातेवाईक तेथे आढळून आले. त्या सर्वांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले.