प्रत्येक विषयाच्या १०० गुणांचे मूल्यमापन करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

ही पद्धत अमान्य असणार्‍या विद्यार्थ्यांची कोरोनानंतरच्या काळात परीक्षा घेणार !

९५ ते ९७ टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही, यामागे केवळ आयुर्वेद आणि योग ! – योगऋषी रामदेवबाबा

‘ज्या लोकांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी ७० टक्क्यांवर गेली होती, ते लोकही योग आणि घरगुती उपचार यांनी बरे झाले आहेत. ९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सनातन प्रभात’च्या व्हिडिओज्ना हिंदूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये व्हिडिओजचे प्रक्षेपण !

दळणवळण बंदीत १५ दिवसांची वाढ करण्यास मंत्रीमंडळाची संमती !

राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे; मात्र २१ जिल्ह्यांत संसर्ग तसाच आहे. म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे दळणवळण बंदीत १५ दिवसांची वाढ करण्यास मंत्रीमंडळाने अनुमती दिली आहे.

शिवराज नारियलवाले यांच्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस महानिरीक्षक

९ एप्रिल २०२१ या दिवशी येथील पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना काठी तुटेपर्यंत अमानुष मारहाण केली होती.

कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !

वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी केले रक्षण

महाराष्ट्र सरकारने ६ वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवली !

मंंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘मद्यबंदीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चालू असलेली अवैध मद्यविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी मद्यबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे सरकारने सांगितले आहे.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची कार्यपद्धत अवलंबवावी ! – मुंबई उच्च न्यायालय

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजना उत्तम असून त्यानुसार राज्यात कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

…अन्यथा ६ जूनला रायगडावरून आंदोलनाला प्रारंभ करणार ! – खासदार छत्रपती संभाजीराजे

शासनाने आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिनी म्हणजे ६ जून या दिवशी रायगडावरून आंदोलनाला प्रारंभ करू, अशी चेतावणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २८ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो.