कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !

वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी केले रक्षण

गोतस्करी करण्यामध्ये धर्मांध पुढे असणे हे त्यांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! याची माहिती गोरक्षकांनाच असते, याविषयी पोलिसांनी विचार करायला हवा.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांध ३ टन गोमांसाची तस्करी करत होता. २३ मे या दिवशी या गोतस्करीची माहिती सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे गोरक्षक निखिल दरेकर यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वाठार येथील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्‍यांना दिली. धारकर्‍यांनी वाठार स्टेशन पोलिसांच्या साहाय्याने ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने गाडी भरधाव वेगाने पुढे नेली. गाडीचा पाठलाग करत गाडी पकडण्यात यश मिळाले. पाहणी केल्यानंतर गाडीत ३ टन एवढे मांस, धड आणि गायी-वासरांचे गोमांस आढळून आले. ते मांस पुण्याला घेऊन जात असल्याचे शेख याने सांगितले. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे गोरक्षक शिवम् चव्हाण, निखिल कानडे, जितेंद्र लोंढे, नीलेश भोसले, सौरभ जाधव, रोहन गायकवाड आणि ऋषिकेश गायकवाड यांनी गोरक्षण केले.