दळणवळण बंदीत १५ दिवसांची वाढ करण्यास मंत्रीमंडळाची संमती !

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण घटत आहे; मात्र २१ जिल्ह्यांत संसर्ग तसाच आहे. म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे दळणवळण बंदीत १५ दिवसांची वाढ करण्यास मंत्रीमंडळाने अनुमती दिली आहे.

या बैठकीत निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करणे, दुकानांच्या वेळा वाढवणे यांना सहमती दर्शवण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी २ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. अन्य दुकाने आणखी आठवडाभर तरी उघडण्यास अनुमती दिली जाणार नाही, असे सांगण्यात येत आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासावरील निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.