सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना प्रवेश अर्ज अल्‍प !

पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये प्रवेश अर्ज अल्‍प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्‍यक !

संगमनेर (अहिल्‍यानगर) येथील बौद्ध धर्माच्‍या मोर्च्‍यात ख्रिस्‍त्‍यांचा शिरकाव !

ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी भोळ्‍या-भाबड्या मागासवर्गीय आणि दलित यांना काही आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केलेले आहे का ? तसेच धर्मांतर करून ख्रिस्‍ती झालेल्‍यांना अ‍ॅट्रोसिटी प्रविष्‍ट करण्‍याचा अधिकार आहे का ?

परभणी येथे आर्थिक व्‍यवहारांद्वारे वैयक्‍तिक मान्‍यतेत अपहार करणारे २ शिक्षणाधिकारी निलंबित !

निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्‍हा अशा अधिकार्‍यांचे स्‍थानांतर करणे, यांमुळे भ्रष्‍ट अधिकार्‍यांच्‍या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई करायला हवी.

मुसलमानांना विदेशातील सुरक्षेसंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून देणे आवश्‍यक !

वास्‍तविक देशाच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या समान नागरी कायद्याविषयी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. यासह मुसलमानांना विदेशातील सुरक्षासंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे मत महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिलचे माजी सदस्‍य अधिवक्‍ता नंदू फडके यांनी व्‍यक्‍त केले.

अमरनाथ यात्रेवर आक्रमणाचा कट रचणार्‍या ५ आतंकवाद्यांना अटक  

‘जर अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले, तर मुंबईतून हज यात्रेकरूंना जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती ! अशा घटनांनंतर त्यांची आठवण होते !

सप्‍तशृंगी गडावरून एस्.टी. बस ४०० फूट दरीत कोसळून एका महिलेचा मृत्‍यू !

सप्‍तशृंगी गडावरून खाली येतांना एस्.टी. बस दरीत कोसळली. या अपघातात अमळनेर मुडी येथील आशाबाई राजेंद्र पाटील या महिलेचा मृत्‍यू झाला आहे. याच गावातील १३ प्रवासी असे एकूण १८ प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०० कोटींचा घोटाळा उघडकीस !

सहकारी संस्‍थेच्‍या जिल्‍हा उपनिबंधकांच्‍या आदेशावरून विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्‍हाण यांनी वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण केले, तसेच जून २०२३ मध्‍ये त्‍यांनी याचा अहवाल वरिष्‍ठांकडे सादर केला.

इंडियन मुजाहिदीनच्या ४ जिहाद्यांना १० वर्षांची शिक्षा !

भारतविरोधी षड्यंत्र रचणार्‍या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून ‘इस्कॉन’चे धार्मिक नेते अमोघ लीला दास यांच्यावर बंदी

अमोघ लीला दास यांनी त्यांच्या विधानाविषयी क्षमा मागितली आहे.

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे थरमन षणमुगरत्नम् राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार !

थरमन यांचा जन्म सिंगापूरमध्येच झाला आहे. सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एका अँग्लो-चिनी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.