संगमनेर (अहिल्‍यानगर) येथील बौद्ध धर्माच्‍या मोर्च्‍यात ख्रिस्‍त्‍यांचा शिरकाव !

प्रतिकात्मक चित्र

संगमनेर (जिल्‍हा अहिल्‍यानगर)- येथे स्‍व. अक्षय भालेराव आणि हिना मेश्राम यांच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ ८ जुलै या दिवशी मोर्चा काढण्‍यात आला होता. या मोर्च्‍यात आरोपी आणि त्‍यांना साहाय्‍य करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याची अन् हे प्रकरण न्‍यायालयात ‘फास्‍ट ट्रॅक’वर (जलदगती न्‍यायालय) चालवण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे, तसेच बौद्ध धर्माच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन प्रांताधिकारी यांच्‍या कार्यालयात नायब तहसीलदार लोंबटे यांना देण्‍यात आले; मात्र या मोर्च्‍यामध्‍ये मोर्चा मार्गावर ‘ख्रिस्‍त्‍यांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, असे फलक घेवून काही ख्रिस्‍त्‍यांनी या मोर्च्‍याचा ताबा मिळवला.

बौद्ध धर्म हा शांतताप्रिय, राज्‍यघटनेला मानणारा आहे. असे असतांना निळ्‍या मोर्च्‍यात शिरकाव करून काही बौद्ध बांधवांनी ख्रिस्‍ती मागण्‍यांचे सर्वाधिक फलक झळकावले. त्‍यांच्‍यावर गुन्‍हे नोंद झाले पाहिजे, अशी मागणी बौद्ध समाजाकडून होत आहे.

ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी भोळ्‍या-भाबड्या मागासवर्गीय आणि दलित यांना काही आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केलेले आहे का ? तसेच धर्मांतर करून ख्रिस्‍ती झालेल्‍यांना अ‍ॅट्रोसिटी प्रविष्‍ट करण्‍याचा अधिकार आहे का ? असा प्रश्‍न संगमनेरकरांनी उपस्‍थित केला आहे.

बर्‍याच कट्टर बौद्ध कार्यकर्त्‍यांनी ख्रिस्‍त्‍यांच्‍या फलकामुळे निळ्‍या मोर्च्‍यातून काढता पाय घेतला, असे निदर्शनास आले.