गोव्यात प्रत्येक मासाला बलात्काराची ७ प्रकरणे नोंद

मागील ६ मासांत महिलांवरील अत्याचारासंबंधी ११९ गुन्हे नोंद झालेले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

वर्ष २०२४ पासून गोव्यातील सर्व नवीन पर्यटन वाहने विजेवर चालणारी असणे बंधनकारक करणार ! – मुख्यमंत्री

नीती आयोगाच्या वतीने आयोजित आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया अन् एशियन डेव्हलपमेंट बँकद्वारे समर्थित ‘पॉलिसी सपोर्ट अँड एनेबलर्स टू एक्सेलरेट इंडियाज इलेक्ट्रिक मोबिलिटी’, या शीर्षकाच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.

गोवा : म्हादई नदीच्या रक्षणासाठी सरकार गंभीर असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

म्हादई जलवाटप तंटा हाताळण्यास गोवा सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. यावर सरकार गंभीर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उत्तर देतांना केला.

राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली.

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्‍या दंडाची वसुली !

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्‍या थकबाकीची वसुली करण्‍यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार ही कार्यवाही चालू आहे.

मोगरा नाल्‍यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

बांधकाम व्‍यावसायिकांसाठी अनेक ठिकाणी नाल्‍याचे वळण पालटणे, त्‍यावर अनधिकृत बांधकामे करणे, नाल्‍याची रुंदी न्‍यून करणे आदी प्रयत्न केले जात असल्‍याचे उपप्रश्‍नांतून आमदारांनी सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिले.

राज्‍यभर मुसळधार पाऊस !

अनेक जिल्‍ह्यांत पूरसदृश स्‍थिती, मुंबई आणि नागपूरसह महाराष्‍ट्रात १२ आपत्‍कालीन पथके कार्यरत, पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज, रायगड आणि पालघरमध्‍ये अतीदक्षतेची चेतावणी !

महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत.

‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे,