‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

अतुल भातखळकर

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या वेळी अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘अबू आझमी यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आणि सभागृह बंद पाडले. अबू आझमी हे सातत्याने अशा प्रकारची वादग्रस्त, देशद्रोही वक्तव्य करत असतात. त्यांच्या या विधानामुळे त्यांची देशद्रोही वृत्ती समाजापुढे आली. सभागृहाबाहेर त्यांनी जर अशा प्रकारचे देशद्रोही वक्तव्य केले, तर त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणीही आम्ही करू.’’