मणीपूरमधील हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना  ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची माहिती

आता सरकारने या माहितीच्या आधारे या देशांतील सरकारांकडे आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करावी. त्यांनी कारवाई केली नाही, तर भारताने या देशांत जाऊन स्वतः कारवाई करून मणीपूर शांत करावे !

मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !

भाजप कार्यालयाची जाळपोळ, तर प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड !

इंफाळ येथे हिंदु मैतेई समजाच्या २ बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार चालू झाला आहे. राज्यातील थौबल जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयाला जमावाकडून आग लावण्यात आली.

मणीपूरमध्ये २ मासांपासून बेपत्ता असणार्‍या मैतेई हिंदु विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे उघड

मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

मणीपूरमध्ये जमावाकडून २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण

इंफाळ येथे जमावाने २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण केले. या वेळी सुरक्षादलांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात १० हून अधिक जण घायाळ झाले.

मणीपूरमध्ये सुटीवर असलेल्या सैनिकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.

मणीपूरमधील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

गेले काही दिवसांपासून राज्यात शांतता निर्माण झाली होती; परंतु आता पुन्हा हा हिंसाचार झाला. मैतेई हिंदु समाज आणि कुकी ख्रिस्ती यांच्यात हा गोळीबार झाला. 

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र गदारोळामुळे अनिश्‍चित काळासाठी स्थगित

मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

मणीपूरमध्ये विधानसभेच्या अधिवेशनाला कुकी संघटनांचा विरोध

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या आवाहनानंतर राज्यपाल अनुसुईया उईके यांनी २९ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.

मणीपूरमध्ये ३० टक्के असणार्‍या ख्रिस्ती धर्मीय कुकी समाजाकडून होत आहे स्वतंत्र राज्याची मागणी !

मणीपूरमध्ये गेल्या ४ मासांपासून हिंसाचार चालू आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता मणीपूरचे विभाजन करून वेगळे ‘कुकीलँड’ राज्य स्थापन करण्याची मागणी ख्रिस्ती धर्मीय असणार्‍या कुकी समाजाकडून केली जात आहे.