विरोधी पक्षांकडून ५ दिवस सत्र चालवण्याची करण्यात आली होती मागणी !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूर विधानसभेचे एक दिवसाचे सत्र २९ ऑगस्ट या दिवशी बोलावण्यात आले होते; मात्र कामकाज चालू होताच गदारोळ झाल्याने ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. ३ मासांनंतर विधानसभेचेे सत्र बोलावण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार विधानसभेचे सत्र ५ दिवस चालवण्याची मागणी करत होते.
The one day session of 12th Manipur legislative assembly was adjourned sine die by the speaker soon after proceedings begun amid ruckus by Congress MLAs.#Manipur #manipurvidhansabha #ManipurViolence #nenews pic.twitter.com/NE7EeUqn9G
— nenewslive (@NENEWS24x7) August 29, 2023
‘राज्यातील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही’, असे त्यांचे म्हणणे होते. यापूर्वी राज्यातील कुकी-झोमी समाजाच्या सर्व १० आमदारांनी या सत्रावर बहिष्कार घातला होता. यात २ मंत्र्यांचाही समावेश होता.