इटलीच्या महिलेकडून तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी काशी येथे शांती अनुष्ठान

इटली येथील सारा नावाच्या महिलेने गंगानदीच्या किनारी तिच्या मृत मुलाच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तुलसी घाटावर अनुष्ठान केल्याची घटना समोर आली आहे. 

मदरशांची माहिती सार्वजनिक करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून संकेतस्थळाची निर्मिती

उत्तरप्रदेशातील अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व मदरशांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होण्यासाठी सरकारने एका संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे तलावात मृत गाय दिसल्यामुळे तोडफोड

बुलंदशहर जिल्ह्यातील अदौली गावातील तलावात एक मृत गाय दिसल्यानंतर येथील गोप्रेमी संतप्त झाले.

सरकारी भूमीवर अतिक्रमण करणार्‍या गुंडांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हा मुख्यालयामधील सर्किट हाऊस परिसराच्या पूर्व द्वाराजवळ गुंडांकडून टिन शेड घालून अतीमहत्त्वाच्या सरकारी भूमीवर मोठ्या प्रामाणात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उत्तरप्रदेशमध्ये कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकल्याने ४० प्रवासी घायाळ

उत्तरप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच खतौली येथे उत्कल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातानंतर २३ ऑगस्टला पहाटे आणखी एक दुर्घटना घडली. औरेया येथे कैफियत एक्सप्रेस रूळांवरून घसरली. यामध्ये ४० प्रवासी घायाळ झाले आहेत.

आग्रा येथे गायी आणि बैल यांच्यावर आम्ल फेकले !

आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात २४ हून अधिक गायी आणि बैल यांच्यावर आम्ल (अ‍ॅसिड) फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राममंदिर उभारणीचा प्रस्ताव मांडावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर होते, असे पुरातत्व खात्याने सर्वेक्षणात म्हटले आहे. याच अहवालाच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर उभारणीच्या संदर्भात संसदेत प्रस्ताव आणावा, अशी मागणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे केली.

अयोध्येत राममंदिरच उभारायला हवे ! – वसीम रिझवी, शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

रामजन्मभूमीवर राममंदिरच उभारायला हवे, तर मशीद अन्यत्र बनवली पाहिजे आणि तिचे नाव ‘मस्जिद-ए-अमन’ ठेवायला हवे, असे प्रतिपादन शिया सेंट्रल वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि गोळीबार

बेहटा गुसाई येथे श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now