गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे गोतस्कर इर्शाद याला चकमकीनंतर अटक

पायाला गोळी लागल्यावर इर्शाद म्हणाला, ‘‘गाय आमची माता आहे !’’

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील लोनी भागामध्ये इर्शाद या गोतस्कराला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये तो घायाळ झाला. इर्शादवर ६ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

२६ ऑक्टोबरला वाहनांची तपासणी चालू असतांना पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबायला सांगितले; पण त्याने पोलिसांकडे दुर्लक्ष करून तेथून पळून जायचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्यावर त्याने पोलिसांवर गोळ्या चालवल्या. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्याच्या पायाला गोळी लागून तो खाली कोसळला. त्याला कह्यात घेतल्यानंतर पोलिसांना तो गोतस्कर असल्याचे कळले.

या घटनेचा व्हिडीओ प्रसारित झाला असून त्यात इर्शाद पोलिसांसमोर गयावया करतांना दिसत आहे. त्यात तो ‘गाय आमची माता आहे’, असे म्हणतांना दिसत आहे.

संपादकीय भूमिका

गोतस्कर पोलिसांवर गोळीबार करतात, याहून ते किती सराईत आणि निर्ढावलेले आहेत, हे लक्षात येते ! अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच त्यांच्यावर वचक बसेल !