बलात्काराला विरोध केल्याने नौशादकडून अल्पवयीन हिंदु युवतीची हाडे तोडून हत्या !

  • बलिया (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • हाताच्या नसा कापल्या, तर पाय कापण्याचाही केला प्रयत्न !

  • नौशादला मुलासारखे मानत होते पीडितेचे वडील !

बलिया (उत्तरप्रदेश) – येथे १४ ऑक्टोबर या दिवशी एका १३ वर्षीय हिंदु युवतीवर नौशाद नावाच्या नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध केल्याने नौशादने तिचा गळा दाबला, तसेच तिला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही, तर तिची हाडे तोडली आणि तिच्या हाताच्या नसाही कापल्या. या वेळी त्याने तिचे पाय कापण्याचाही प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अत्यवस्थ स्थितीत तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. शेवटी २२ ऑक्टोबर या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नौशादला अटक केली आहे. मृत पीडितेच्या कुटुंबियांनी ‘नौशादला तडपून ठार मारण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.

या घटनेविषयी पीडितेच्या वडिलांना समजल्यावर ते म्हणाले होते की, ते नौशादला स्वत:चा मुलगा असल्यासारखे मानायचे. त्याला घरी सहजपणे यायची मुभा होती. तो त्यांच्या घरापासून केवळ १० मीटर अंतरावर रहायचा.

संपादकीय भूमिका

  • अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत !
  • हिंदूंनो, धर्मांधांशी केलेली जवळीक महागात पडते, हे वर्ष १९९०-९१ मध्ये काश्मिरी हिंदूंनी चांगलेच अनुभवले. आताही हिंदूंची मानसिकता पालटलेली नाही, हेच या घटनेतून लक्षात येते !