(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे भाजपचे स्वप्न केवळ स्वप्नच रहाणार !’

समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल मेहमूद यांचा हिंदुद्वेष !

समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल मेहमूद

संभल (उत्तरप्रदेश) – भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी भाजप धर्म आणि जाती यांचे राजकारण करत आहे; पण या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचे भाजपचे स्वप्न केवळ स्वप्नच रहाणार आहे, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार इक्बाल मेहमूद यांनी केले आहे.

इक्बाल यांनी केजरीवाल यांच्यावरही टीका केली आहे. केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे चित्र छापण्याची मागणी केल्यावरून इक्बाल यांनी म्हटले की, हा देश सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी बलीदान दिले आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजप यांनी राजकारण सोडून मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्च यांमध्ये जाऊन देशाची प्रगती अन् रोजगार यांसाठी प्रार्थना करावी.

संपादकीय भूमिका

  • भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत असलेली घोडदौड पाहून वैफल्यग्रस्त झालेल्या इक्बाल मेहमूद यांची पायाखालची वाळू सरकल्यानंतर जी स्थिती होते, तशी त्यांची स्थिती झाली आहे, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही !
  • भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे नाही, तर ‘भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे जिहाद्यांचे स्वप्न हे स्वप्नच रहाणार आहे’, हे इक्बाल यांनी लक्षात ठेवावे !