गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील विश्‍व हिंदु परिषदेचे नेते विकास मिश्रा यांच्यावर प्राणघातक आक्रमणाचा प्रयत्न झाला. या प्रकरणी त्यांनी त्यांच्या सहकार्‍यासह आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. अस्लम उपाख्य चक्कू असे त्याचे नाव आहे.

दिवाळीच्या रात्री मिश्रा त्यांच्या मित्रांना भेटण्यास जात असतांना अस्लम याने त्यांना रोखले आणि त्यांच्यावर बंदूक रोखली. ‘तुला मी नरकात पाठवणार आहे’, असे सांगत त्याने गोळी झाडली. ती गोळी मिश्रा यांना लागली नाही. त्याच वेळी मिश्रा यांनी अस्लमच्या हातातून बंदुक खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पळू लागल्यावर त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांवर अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !