दोन वर्षांपासून चालू होत्या धर्मांतराच्या गुप्त कारवाया !
मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील मंगतापुरम् येथे साहाय्य करण्याच्या बहाण्याने ४०० हून अधिक गरीब हिंदूंचे बलपूर्वक ख्रिस्ती पंथात धर्मांतर करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या २ वर्षांपासून धर्मांतराच्या कारवाया चालू होत्या. या धर्मांतराला पोलिसांचा निष्काळजीपणा उत्तरदायी असल्याचे समोर आले आहे.
Mass conversion racket busted in Meerut: Christian evangelists lure 400 Hindus to convert, remove idols and threaten against performing pujahttps://t.co/Iuoqg6JxQP
— OpIndia.com (@OpIndia_com) October 29, 2022
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की,
१. बारांबकी येथील १० लोक अनुमाने २० वर्षांपूर्वी मंगतापुरम येथे आले आणि मोकळ्या जागेत झोपडपट्टीत राहू लागले. आता त्यांची संख्या ४०० पेक्षा अधिक झाली आहे.
२. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा उपासमारीची वेळ आली, तेव्हा देहलीचे पाद्री महेश त्यांना साहाय्य करण्याच्या बहाण्याने तेथे पोचले. त्यांनी इतर खिस्त्यांच्या साहाय्याने तेथील लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्यांना साहाय्य केले.
३. पाद्री महेश यांनी काही जणांना विश्वासात घेऊन झोपडपट्टीत रहाणार्या लोकांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे येथील सुमारे ४०० लोकांनी धर्मांतर केले आणि ते चर्चमध्येही जाऊ लागले. पाद्रीने येथील धर्मांतरित लोकांच्या मुलींचे लग्नही ख्रिस्ती समाजातील तरुणांशी लावून दिले.
४. यानंतर ख्रिस्ती धर्माशी संबंधित लोकांनी या लोकांवर हिंदु धर्मानुसार पूजा न करण्यासाठी दबाव आणला. ‘तुम्ही ख्रिस्ती झाला आहात. तुम्ही आता हिंदु देवतांची पूजा करू शकत नाही’, असे सांगत देवतांच्या मूर्ती हटवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला.
५. पाद्री महेश यांचा नोकर अनिल याने त्याच्या काही सहकार्यांच्या साहाय्याने दीपावलीच्या वेळी लोकांच्या घरांतून देवतांची छायाचित्रे हटवली आणि ती फाडून टाकली. या वेळी चॅम्पियन नावाच्या तरुणाने धर्मांतराला विरोध केला. ख्रिस्त्यांच्या छळाला कंटाळून लोकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
६. या धर्मांतराच्या प्रकरणाचे वृत्त कळताच बजरंग दलाचे दिलीप सिंह आणि सचिन सिरोही तेथे पोचले. त्यांनी तेथील ख्रिस्ती पंथाशी संबंधित पुस्तके आणि आर्थिक साहाय्य मिळालेल्या लोकांची सूची पोलिसांना सुपुर्द केली.
७. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अन्वेषण चालू केले. या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|