आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी  टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.

शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, संधीसाधू आहेत ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

या वेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये जाण्याविना पर्याय नाही. शरद पवार यांचीही मी शाश्वती देत नाही.

वेदगंगा नदीत ४ जण बुडाले !

कोल्हापुरातील आणूर गावातील यात्रेसाठी ते आले होते. नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्यावर त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला अटक !

अटकेनंतर भावेश भिंडे याला मुंबईत आणण्यात आले असून या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

बीड येथे पोलिसांच्या घरात सापडले १ कोटी रुपये, तसेच सोन्या-चांदीचे दागिने !

पोलीस खात्यात असे पोलीस असतील, तर कधीतरी देश भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशांना कठोर शिक्षाच हवी !

कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोड्या वाढल्या !

सलग ४ दिवस कल्याण पूर्व आणि डोंबिवली येथे घरफोड्या करण्यात आल्या. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस पडल्यामुळे लोखंडी होर्डिंग कोसळले !

येथील काही भागांत वादळी वार्‍यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही घायाळ झालेले नाही.

तमनार वीजवाहिनी प्रकल्पावरून ‘गोवा फॉऊंडेशन’ची सर्वाेच्च न्यायालयात याचिका

तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी सांगोड, मोले येथे २ सहस्र ६७९ झाडे कापण्यात आली आहेत; मात्र ही हानी भरून काढण्यासाठी नवीन झाडे लावण्याचा तमनार वीजवाहिनी प्रकल्पाने केलेला उपक्रम निष्फळ ठरला आहे

गोव्यात यंदापासून इयत्ता ९ वीसाठी लागू होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण !

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिन्यापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एन्.ई.पी.ची) कार्यवाही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.