मेट्रो कारशेडच्या प्रश्‍नाविषयी आवश्यकता भासल्यास शरद पवार पंतप्रधानांशी चर्चा करतील ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

शरद पवार यांनी मेट्रो कारशेडविषयी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.

‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’कडून शासकीय अनुदानाचा अपलाभ घेतल्याची तक्रार !

सातारा नगरपालिकेने ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला नोटीस बजावली आहे.

ऐतिहासिक ‘राजवाडा’ जतन करण्याची इतिहासप्रेमींकडून मागणी

शासनाने नवीन राजवाडा हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावेत, = इतिहासप्रेमी

किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद

महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !

दर नियंत्रणाच्या आदेशाला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने ‘आय.एम्.ए.’ची नाराजी !

कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना त्यांच्याप्रमाणे दर निश्‍चित करू द्या.=हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !

कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी (तालुका खेड) येथे अपघात : दुपारी ३ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीहून रत्नागिरीकडे जाणार्‍या रेल्वेच्या देखभाल करणार्‍या गाडीची (मेन्टेनन्स व्हॅनची) मागील चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक अनुमाने ८ घंटे ठप्प झाली होती.

केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांच्या सासूबाई श्रीमती राधाबाई तिगडी (वय ९१ वर्षे) यांचे १६ डिसेंबर २०२० या दिवशी दुपारी ३.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.