अनुदान लाटण्यासाठी राज्यात ८०० बोगस शाळा चालू !

शेकडोंच्या संख्येत बोगस शाळा चालवणारे आणि त्यांना मान्यता देणारे अशा सर्वांवरच कारवाई व्हायला हवी !

किराडपुरा येथे चिथावणी देणार्‍या प्रमुख संशयितांमध्ये व्यावसायिकाचा समावेश !

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीचे प्रकरण
आणखी ८ धर्मांधांना अटक !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

 हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले.

ओटीटी’वर दाखवली जाणारी अश्‍लील दृश्ये, नग्नता, शिवीगाळ हे थांबायला हवे ! – सलमान खान, अभिनेते

खान यांनी जे विधान केले आहे, ते योग्यच आहे; मात्र ते रोखण्यासाठी ते पुढाकार घेणार का, हेही त्यांनी सांगावे !

देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी !

केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

अमित शहा यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण !

ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती ३० सहस्र किलो वजनाची आहे. ही मूर्ती ७ किलोमीटर अंतरावरूनही दिसते. ही मूर्ती बनवण्यासाठी ६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहेत.

कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्र्याच्या विरोधात गुन्हा नोंद

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

उदयपूर (राजस्थान) जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी

राजस्थानच्या काँग्रेस सरकारच्या राज्यातील तुघलकी निर्णय !  भारतात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असतांना अशा प्रकारची बंदी कशी काय घातली जाऊ शकते ?

पुणे येथील संगमवाडी नदीपात्रात सापडलेले शिवपिंड २५० वर्षांपूर्वीचे ! – इतिहास अभ्यासक समीर निकम

काळाच्या ओघात गडप झालेल्या वास्तू किंवा साहित्य यांच्या विषयीचा सत्य इतिहास समोर आणण्याचे कार्य पुरातत्व विभागाने करणे अपेक्षित आहे; मात्र भारतातील पुरातत्व विभाग त्या दृष्टीने काहीच करतांना दिसत नाही, हे चिंताजनक आणि दुर्दैवी आहे !

छत्रपती संभाजीनगर येथील ‘मास कॉपी’प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा भोंगळ कारभार !