|
छत्रपती संभाजीनगर – किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी झालेला किरकोळ वाद मिटल्यानंतर काही घंट्यांत अफवा पसरवली गेली आणि शेकडोंचा जमाव मंदिराच्या दिशेने धावून आला. या तरुणांना चिथावणी देणार्यांमध्ये स्वत: ‘धर्माचा अभ्यासक’ असल्याचे सांगणारा, तसेच भूमी खरेदी-विक्रीचे काम करणारा एका मुसलमान व्यावसायिकाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याने शहरात मध्यरात्री तरुणांची माथी भडकावून इतर साथीदारांसह सकाळी ६ वाजेपर्यंत शहर सोडल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात समोर आले आहे.
किराडपुऱ्यात चिथावणी देणाऱ्या प्रमुख संशयितांमध्ये व्यावसायिक; पहाटेपूर्वीच दंगेखोरांसह पसार, काय आहे प्रकरण?
👉 https://t.co/JOqgfDc50N
#मराठी #मराठी_बातम्या #Marathi #MarathiNews #Navarashtra— Navarashtra (@navarashtra) April 6, 2023
अ. ३० मार्च या दिवशी किराडपुरा येथे किरकोळ वादाचे रूपांतर दंगलीत झाले. रात्री १२ च्या वाजण्याच्या सुमारास २ तरुणांच्या गटांत वाद चालू झाला. पोलिसांनी प्रयत्न करून हा वाद मिटवला. दोन्ही गट नंतर तेथून निघून गेले; मात्र याच वेळी काही समाजकंटकांनी त्याचा अपलाभ घेतला.
आ. किराडपुरा परिसरातून तरुणांचे गट निघून गेल्यानंतर अर्ध्या घंट्यांत जिन्सी परिसरात अफवांचे पीक पसरवले गेले आणि पुढील अनर्थ घडला. यात प्रामुख्याने पोलिसांना लक्ष्य केले गेले. जवळपास पहाटे ४ वाजता पोलिसांकडून दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
इ. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाला उद्युक्त करणार्यांची काही नावे पोलिसांनी उघड केली आहेत. प्रमुख संशयित असलेला व्यावसायिक हा ३० ते ३५ वर्षे वयोगटांतील असून तो मूळ बीड शहराचा रहिवासी आहे. ८ वर्षांपूर्वी तो जिन्सी भागात रहाण्यासाठी आला होता. काही पथके त्याचा बाहेरील जिल्ह्यात शोध घेत आहेत.
१६० अधिकारी आणि कर्मचारी यांचे २४ घंटे अन्वेषण चालू !
या प्रकरणात १६० कर्मचारी आणि अधिकारी २४ घंटे अन्वेषण करत आहेत. विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी), व्यतिरिक्त गुन्हे शाखेचे ८० टक्के कर्मचारी आणि अधिकारी दंगलीच्या अन्वेषणात आहेत. १७ पोलीस ठाण्यांचा प्रत्येकी १ अधिकारी, २ कर्मचारी यांची अन्वेषणासाठी नियुक्ती केली आहे. (धर्मांधांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या २४ घंट्यांचा लाभ झाला, असे म्हणता येईल. – संपादक)
आणखी ८ धर्मांधांना अटक !
३ एप्रिलच्या रात्री विशेष अन्वेषण पथकाने किराडपुरा दंगलीतील आणखी ८ धर्मांधांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस्. वानखडे यांनी दिला आहे. सय्यद शहेबाज सय्यद जिलानी (वय २४ वर्षे), शेख कलीम शेख सलीम (वय २५ वर्षे), शेख सोहेल शेख खाजा (२० वर्षे), आमेर सोहेल लतीफ खान (वय २४ वर्षे), अल खुतूब हबीब हमद (वय ३० वर्षे), हबीब हसन हबीब उमर (वय ३६ वर्षे), राशेद दीप सालमीन दीप (वय २३ वर्षे) आणि सोहेल खान अमजद खान (वय २१ वर्षे) अशी धर्मांधांची नावे आहेत. ‘गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींच्या साथीदारांची चौकशी करायची आहे. गुन्ह्यात वापरलेल्या लाठ्या-काठ्या आणि सळया हस्तगत करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुन्हा करण्यामागील आरोपींच्या हेतूचे अन्वेेषण करणे शेष असल्याने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी’, अशी विनंती साहाय्यक सरकारी अधिवक्ता समीर बेदरे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !