उदयपूर (राजस्थान) जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी

उदयपूर (राजस्थान) – उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा यांनी जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी धार्मिक झेंडे लावण्यावर बंदी घातली आहे, तसेच जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. ही बंदी २ मासांसाठी असणार आहे. हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री हा आदेश जारी करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशामध्ये राजकीय इमारत, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पार्क, चौक, विद्युत् दिव्यांचे खांब, दूरभाष वायर्सचे खांब आदी ठिकाणी हे झेंडे लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • राजस्थानच्या काँग्रेस सरकारच्या राज्यातील तुघलकी निर्णय !  भारतात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य असतांना अशा प्रकारची बंदी कशी काय घातली जाऊ शकते ?
  • भारतात बहुसंख्य हिंदूंचे वर्षभरात अनेक सण आणि उत्सव साजरे होत असतांना या बंदीचा सर्वाधिक परिणाम हिंदूंवरच होणार असल्याने हिंदूंनी वैध मार्गने विरोध करणे आवश्यक आहे !