यापुढे अनाथ मुलांना मिळणार अपंग व्यक्तींप्रमाणे आरक्षण !

यापूर्वी राज्यशासनाने शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून १ टक्का आरक्षण घोषित करण्यात आले होते. वर्ष २०१८ मध्ये घेतलेल्या या निर्णयामध्ये राज्यशासनाने पालट केला आहे. यापुढे अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गाऐवजी अपंग व्यक्तींप्रमाणे एकूण जागांच्या १ टक्का आरक्षण …

जोतिबा यात्रेच्या (जिल्हा कोल्हापूर) काळात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त !

जोतिबा देवाच्या यात्रेच्या काळात जोतिबा डोंगर, तसेच कोल्हापूर बसस्थानक येथे झालेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त झाले आहेत. जोतिबाच्या डोंगरावर गळ्यातील साखळी, मंगळसूत्र चोरून नेणे, खिशातील पाकीट चोरून नेणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात ८०० ठिकाणी गदापूजन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !

शहरांची नावे पालटण्याचा अधिकार सरकारचा ! – सर्वोेच्च न्यायालय

‘औरंगाबाद’ शहराचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रहित !

जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पदवी परीक्षेत चक्क सामूहिक कॉपी चालू असल्याचा प्रकार एका विद्यार्थिनीने समोर आणला होता.

हनुमान जयंतीनिमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये फलक प्रसिद्धी, सामूहिक नामजप आणि मारुति स्तोत्र पठण, प्रवचन तसेच ठिकठिकाणच्या मारुति मंदिरात ग्रंथ, सात्त्विक उत्पादनांचे कक्ष, फ्लेक्स प्रदर्शन लावणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटवली !

महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने ६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठ रंगार गल्ली, पैठणगेट, सिटी चौक, औरंगपुरा या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली.

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ एप्रिलला सुनावणी होणार !

तोपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेले संरक्षण कायम असणार आहे. न्यायमूर्ती एम्.जी देशपांडे यांच्या न्यायालयात या प्रकरणावर निर्णय देण्यात येणार आहे.

आमदार निधी वाटपाविषयी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेले प्रमाणपत्र राज्य सरकारकडून मागे !

५ एप्रिल या दिवशी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर्.एन्. लड्डा यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली आहे.