देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी !

देहली, बिहार आणि बंगाल येथे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आल्या मिरवणुका !

पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलेल्या मिरवणुका !

नवी देहली – देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अयोध्येतील पुरातन हनुमान गढी येथे साधू-संतांच्या उपस्थितीत हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त देशभरात मिरवणुकाही काढण्यात आल्या. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हनुमान जयंतीच्या मिरवणुकांसाठी बंदोबस्त ठेवण्याची सूचना केल्यानंतर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(सौजन्य : India Today)

गेल्या वर्षी देहलीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक झाल्याने येथेही पोलिसांनी अनेक अटी घालत मिरवणुकीला अनुमती दिली होती. (दगडफेक करणार्‍यांना रोखण्याऐवजी हिंदूंच्या मिरवणुकांवर निर्बंध लादणारे पोलीस ! – संपादक) बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या बंदोबस्तात मिरवणुका काढण्यात आल्या. हुगळी येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी येथे आदल्या दिवशी ध्वज संचलन केले होते.

(सौजन्य : Times Of India)

संपादकीय भूमिका

केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !