ओडिशा अपघातस्थळावरील रेल्वे वाहतूक ५१ घंट्यांनी पूर्ववत् !

अपघातानंतर ५१ घंट्यांनी जेव्हा पहिली रेल्वे रुळावरून मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे होते. ते म्हणाले की, आमचे दायित्व अजून संपलेले नाही. ‘हरवलेल्या लोकांना शोधणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणत ते भावूक झाले.

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेला धार्मिक रंग देऊ नका ! – ओडिशा पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी एका निवेदनाद्वारे जनतेला आवाहन केले आहे की, असे करणे अत्यंत दुर्दैवी आहे. सामाजिक माध्यमांतून अपघाताच्या संदर्भातील वृत्तांना धार्मिक रंग देऊ नका.

ओडिशात पुन्हा झालेल्या अपघातात मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले !

कोरमंडल एक्सप्रेसच्या नुकत्याच झालेल्या भीषण अपघातानंतर आता ओडिशा राज्यातच आणखी एका रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे.राज्याच्या बारगढ जिल्ह्यातील मेंधापाली गावाजवळ एका खासगी सीमेंट कारखान्याच्या आवारात एका मालगाडीचे ५ डबे रुळावरून उतरले.

ओडिशातील अपघातग्रस्तांना रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्याकडून साहाय्य

किती इस्लामी आणि ख्रिस्ती संघटना अशा प्रकारचे कार्य करतात ? हिंदूंच्या  या संघटनांवर बंदीची मागणी करणार्‍या किती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते साहाय्यासाठी धावून आले, हेही त्यांनी सांगायला हवे !

ओडिशातील रेल्वे अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती ! – रेल्वे बोर्ड

बालासोर येथील रेल्वे अपघाताविषयी रेल्वे बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती देण्यात आली. बोर्डाच्या अधिकारी जया सिन्हा यांनी या वेळी सांगितले की, हा अपघात सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटांमुळे झाला ओडिशातील रेल्वे अपघात ! – अश्‍विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

ओडिशातील बालासोर येथे २ जून या दिवशी झालेल्या रेल्वे अपघातामागील कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून अपघाताचे कारण स्पष्ट झाले आहे.

ओडिशात भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९० हून अधिक !

भुवनेश्‍वर येथून चेन्नईला जाणार्‍या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.

ओडिशातील शिवमंदिरांत गांजा अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद वाटणे यांवर बंदी ! – ओडिशा सरकारचा निर्णय

हिंदूंच्या मंदिरांमध्ये काय असावे आणि काय नसावे, याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारांना नाही, तर धर्मचार्यांनाच असला पाहिजे !