ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेला धार्मिक रंग देऊ नका ! – ओडिशा पोलिसांचे आवाहन

भुवनेश्‍वर (ओडिशा) – बालासोर येथील भीषण अपघाताला काही समाजकंटकांकडून धार्मिक रंग दिला जात आहे, असा आरोप ओडिशा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी एका निवेदनाद्वारे जनतेला आवाहन केले आहे की, असे करणे अत्यंत दुर्दैवी आहे. सामाजिक माध्यमांतून अपघाताच्या संदर्भातील वृत्तांना धार्मिक रंग देऊ नका.

आमची सगळ्यांना विनंती आहे की, अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित करू नका. या माध्यमातून दोन धर्मियांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.