महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही ! – जरांगे यांची शासनाच्या शिष्टमंडळाला चेतावणी

महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांना शासनाचे शिष्टमंडळ भेटायला गेले होते, त्या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली.

पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील फलकधारकांना थकीत शुल्क भरण्यासाठी नोटीस !

महापालिकेच्या ‘आकाश चिन्ह’ आणि ‘परवाना विभागा’ने शहरातील १ सहस्र १०० विज्ञापनफलक (होर्डिंग) धारकांना थकीत शुल्क भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना आक्रमक !

त्यांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिला आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ञांचे एक पथक उपस्थित आहे; परंतु मनोज जरांगे पाटील वैद्यकीय पथकाकडून पडताळणी करून घेण्यास किंवा उपचार करून घेण्यास सिद्ध नाहीत.

नैना परिक्षेत्रामध्ये ‘यू.डी.सी.पी.आर्.’विषयी राज्यशासन सकारात्मक ! – उद्योगमंत्री उदय सामंत

मागील २ वर्षांपासून पनवेलचे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आतापर्यंत नैनाबाधितांना केवळ आश्वासने देण्यात आली आहेत.

भाजपची राज्यसभेची ३ नावे घोषित !

भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ घंट्यांनंतर अशोक चव्हाण, पुण्याच्या प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय !

राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय चालू करणार.

जैन आचार्य प.पू. १०८ आचार्यश्री विद्यासागर महाराज ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ पदवीने सन्मानित !

जैन धर्मातील महान संत शिरोमणी परम पूज्य १०८ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी आतापर्यंत जैन परंपरेनुसार ५५० पेक्षा अधिक जणांना दिगंबर मुनी दीक्षा दिल्या आहेत.

प.पू. स्वामीजी यांच्यावर मान्यवरांनी अर्पिली स्तुतीसुमने आणि केला गुणगौरव !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ६० वर्षे नुकतीच पूर्ण केली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.

मॉरिस नोरोन्हा याने घेतले होते ‘यूट्यूब’वरून बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण !

यूट्यूबवरून संबंधित व्हिडिओ पाहून  त्याने गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

श्रीराममंदिराची स्थापना हा पाया आहे, तर हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे हे आपले ध्येय ! – श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना सोहळा आपण अनुभवला, तेव्हापासून मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला होत आहे. आता तेवढ्यावरच न थांबता त्याचे हिंदु राष्ट्रात रूपांतर करणे, हे आपले ध्येय आहे, असे मनोगत हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी व्यक्त केले.