चौकुळ येथे गवारेड्याच्या आक्रमणात एक जण घायाळ

गवारेड्या

सावंतवाडी – तालुक्यातील चौकुळ गावातील सीताराम विश्राम गावडे (वय ८० वर्षे) यांच्यावर ५ एप्रिलला एका गवारेड्याने त्यांच्या घरानजीक आक्रमण करून त्यांना घायाळ केले. नातेवाइकांनी गावडे यांना प्रथम आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करून प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.