मद्याची अवैध वाहतूक : २ जणांवर गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात ५ एप्रिलला रात्री कारवाई केली. या वेळी पोलिसांनी १ लाख ३२ सहस्र रुपयांचे मद्य आणि ७ लाख रुपयांचा टेंपो, असा एकूण ८ लाख ३२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला, तसेच  या प्रकरणी विराज वाडकर आणि प्रशांत कोठावळे (दोघेही रहणार कोलगाव, सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.