मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘रन फॉर वोट लोकशाही दौड’ची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद !

जिल्हाधिकारी अमोल येडगे (डावीकडून दुसरे) यांना ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्रदान करतांना संस्थेचे पदािधकारी

कोल्हापूर – मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ एप्रिलला घेण्यात आलेल्या ‘रन फॉर वोट लोकशाही दौड’मध्ये ६ सहस ३५९ नागरिक सहभागी झाले. पोलीस परेड मैदानावर झालेल्या या दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक शासकीय-खासगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग, ज्येष्ठ धावपटू यांनी सहभाग घेतला. या विक्रमी लोकशाही दौडची नोंद आंतरराष्ट्रीय ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. संबंधित संस्थेकडून नोंदीचे सन्मानपत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी मानवी रांगोळीचे यशस्वी आयोजन करून प्रशासनाने त्याचीही नोंद राष्ट्रीय स्तरावर केली होती. कोल्हापूर नेहमीच आगळे-वेगळे उपक्रम करून सर्व जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओळखले जाते. मतदान टक्केवारीतही प्रत्येक वेळी कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी रहातो.

मतदार जागृती दौडीत सहभागी नागरिक