श्री महालक्ष्मीदेवी शक्तीपिठ आणि पर्तगाळी मठाचा स्नेहबंध विविध सामाजिक उपक्रमांनी दृढ करू !  – श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

भाविकांना मार्गदर्शन करतांना श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

कोल्हापूर – पर्तगाळी मठ भारतीय परंपरेच्या शालेय शिक्षणासह वृद्धाश्रमापर्यंत सर्वच समाजउपयोगी कार्यात सहभागी आहे. श्री महालक्ष्मीदेवी शक्तीपिठ आणि पर्तगाळी मठाचा स्नेहबंध भविष्यात शाळा, बालसंस्कारवर्ग, मठशाखा उभारणी यांसह विविध सामाजिक उपक्रमांनी दृढ करू, असे प्रतिपादन गोवा येथील ‘गोकर्ण पर्तगाळी मठा’चे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी केले. अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी कोल्हापूरसह सातारा, सांगली, गोवा, कारवार, बेळगाव, मंगळुरू येथून भाविक सहकुटुंब उपस्थित आहेत.

तत्पूर्वी ६ एप्रिलला तुतारीच्या निनादात आणि मशालीसह पुष्पवृष्टी करत पंचारतीने ओवाळून स्वामीजींच्या आगमनार्थ अक्षता मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्यासाठी सारस्वत समाज, जी.एस्.बी. कोकणी व्यासपीठ, सुशांत पै, उमेश प्रभु, दिनेश प्रभु, रामनाथ बालिंगा, उदय कामत, करुणाकर नायक, आनंद शानभाग, नित्यानंद प्रभु यांसह अन्यांचे भरीव योगदान लाभत आहे.