५ महिन्यांत मुंबईतील केवळ ४ सहस्र ३५८ वाहने प्रदूषण करत असल्याचे निष्पन्न !

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रदूषण करणार्‍या वाहनांची पडताळणी चालू  

मुंबई – वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नोव्हेंबर २०२३ पासून संबंधित वाहनांवर कारवाईस प्रारंभ केला आहे. ८ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीत ३० सहस्र ७८१ वाहनांची पडताळणी केली. यात केवळ १४ टक्के म्हणजे ४ सहस्र ३५८ वाहने प्रदूषण करत असल्याचे आढळले.

मुंबई महानगरातील बोरिवली, मुंबई मध्य, मुंबई पश्‍चिम, मुंबई पूर्व, ठाणे, कल्याण, पेण, पनवेल, वसई या ९ परिवहन कार्यालयांतील प्रदूषण नियंत्रण पथके प्रदूषण करणार्‍या वाहनांवर कारवाई करत आहेत.

संपादकीय भूमिका 

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात प्रतिदिन सहस्रो वाहने प्रदूषणकारी धूर सोडत असतांना केवळ १४ टक्के वाहनेच प्रदूषणकारी कशी आढळली ?