राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘बहुउद्देशीय संगणक केंद्र’ स्थापन करण्यात येणार !

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असणारे ‘ई वाचनालय आणि अभ्यासिका’ असलेले बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

सिंधुदुर्ग : विकलांग तरुणीवरील अत्याचाराच्या प्रकरणातील डॉक्टरवर कारवाईची मागणी

पीडित तरुणी संशयित आरोपीचा घरी घरकामास होती. अत्याचार झाल्यानंतर पीडित तरुणीने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना उघड झाली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट !

या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ श्री. विपुल शहा यांना भेट दिला. विपुल शहा म्हणाले, ‘‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ हे विषय संवेदनशील आहेत. यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.’’

खराडी (पुणे) येथे मुठा नदीवर डासांचे वादळ आल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित !

गणेशोत्सव काळात नदी प्रदूषित होईल, असे सांगत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी अशा घटनांवर काहीच बोलत नाहीत, हेही हिंदूंनी लक्षात घ्यावे !

सिंधुदुर्ग : अरुणा धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ९ व्या दिवशीही चालू

आंदोलनाला ९ दिवस होऊनही संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आले नाही. त्यामुळे १० व्या दिवशी विहिरीविषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याची चेतावणी धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

घाटकोपर (मुंबई) मध्ये कुख्यात धर्मांध महिला गुन्हेगाराची पुन्हा दहशत !

समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने एवढ्या कुख्यात गुन्हेगाराला कारागृहाच्या बाहेर न सोडण्यासाठी जामीन मिळू नये असा उपाय पोलीस का काढत नाहीत ?

मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्यशासनाने ‘माहिती अधिकार आयोगा’तील रिक्त जागा भरल्या नाहीत !

अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ का येते ? राज्य सरकारने माहिती आयोगातील रिक्त जागा न भरणे, हे त्यांच्या कर्तव्यांपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. जनतेने यासाठी जाब विचारणे आवश्यक आहे !

हिंजवडी येथे बनावट पारपत्र सिद्ध करणारे कह्यात !

परदेशात जाण्यासाठी बनावट पारपत्र सिद्ध करणार्‍या तिघांसह बनावट शिक्का बनवून देणार्‍यालाही हिंजवडी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. आरोपींनी १२५ लोकांकडून मूळ पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्रे बनवली.

ससून रुग्णालयात लागलेल्या आगीचा धोका टळला !

वॉर्डमधील रुग्ण सुखरूप असून रुग्णालयातील आग पूर्णपणे विझली आहे. यामध्ये कुणी घायाळ झाले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही. शौचालयात अज्ञात व्यक्तीने धूम्रपान केल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खडकवासला (पुणे) येथे ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन !

खडकवासला धरणासमोरील पाटबंधारे विभागाच्या ११ एकर जागेमध्ये ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘पर्यटन विकास योजने’तंर्गत हे काम होणार आहे.