‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढत्या स्वैराचारी वृत्तीला आळा घालण्यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

अनमोल भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्‍या ‘डे संस्कृती’चे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचेच सर्वाधिक दुष्परिणाम ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने बघायला मिळतात.

दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणारी ५६ वर्षांची व्यक्ती अटकेत !

वासनांधांपासून आपल्या लेकीबाळींचे रक्षण करण्यासाठी पालकांनी सतर्क रहायला हवे ! अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी !

वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू !

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण घेत असलेली वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा ५ मे दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया चालू झाली असून ९ मार्चपर्यंत त्यासाठी मुदत दिली आहे.

पिंपरीतील (पुणे) लांडेवाडी येथील ‘शिवसृष्टी’ची दुरवस्था, महापालिकेचे दुर्लक्ष !

शिवसृष्टीची देखभाल न करणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार सामान्य नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ?

मीरा-भाईंदर येथे कुत्र्याप्रमाणे रस्त्यावरून चालणार्‍या तरुणीचा व्हिडिओ प्रसारित !

आपल्या संस्कृतीत विविध योनींमधून मानवी जन्म मिळणे, ही महत्त्वाची गोष्ट समजली जाते. असे असतांना प्राण्यांप्रमाणे कृत्य कराविशी वाटणे, हे मानवाची अधोगतीच झाल्याचे दर्शवत नाहीत काय ? समाजाला साधना न शिकवल्याचे हे परिणाम आहेत !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतांची वंदनीय उपस्थिती !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.

मुंबईजवळील घारापुरी लेण्यांत पूजेच्या अधिकारासाठी हिंदूंचे आंदोलन !

हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आणि धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी लेण्यांत हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा, या मागणीसाठी हिंदूंनी १५ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन केले.

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष,  विधानसभा

अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाने याला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांचे संख्याबळ स्पष्ट होते. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे.

Yerwada Jail Crime : आंदेकर टोळीतील आरोपींकडून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कारागृह अधिकार्‍याला मारहाण !

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने टोक गाठले आहे. यावरून गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याचे स्पष्ट होते. हे पोलिसांना लज्जास्पद !

सिंधुदुर्ग : हानीभरपाई मिळण्यासाठी पूरग्रस्त विलवडेवासियांची आंदोलन करण्याची चेतावणी !

जनतेला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?