भ्रमणभाषच्या दुकानातून ३९ लाख रुपये जप्त !
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले.
१३ मे या दिवशी लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान !;
ईडीच्या म्हणण्यानुसार, मोनार्क ग्रुप आणि संचालक यांनी एकच फ्लॅट अनेक जणांना विकला आणि ग्राहकांच्या माहितीविना आधीच विकलेले फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतले.
नाशिकमध्ये ११ मे या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वार्यासह पाऊस आला. पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
या प्रकरणी एक शिक्षक, त्याची पत्नी, एक माजी विद्यार्थी आणि दोन संशयित महिला यांना पोलिसांनी अटक केली आहे. या बाळाची २३ लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती.
हे धक्के सौम्य असले, तरीसुद्धा त्यांमागील नेमकी कारणे आता शोधली जाणार आहेत.
मी ओवैसींना आव्हान देते, मी भाग्यनगरला येते मला रोखून दाखवा. आज देशभरात रामभक्त आहेत हे विसरू नका, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे.
पी.एम्.पी.एम्.एल्.कडे टप्प्याटप्प्याने ६५० नवीन इ-बस येणार होत्या. या सर्व गाड्या वर्ष २०२१ पर्यंत येणार होत्या. आतापर्यंत ४७३ इ-बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अजूनही १७७ इ-बस प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.
‘सुकाणू समिती’चे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरांविषयी महाविद्यालयांमध्ये गोंधळ दिसत आहे. परंपरांचे उदात्तीकरण नव्हे, तर त्यातील ज्ञान, विज्ञान पुढे येणे आवश्यक आहे. ‘आय.के.एस्.’विषयी आम्ही लवकरच सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे सांगू.