हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या ! – आमदार नितेश राणे, भाजप

आमदार नितेश राणे, भाजप

नालासोपारा – पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी एक मत भाजपला द्या, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, ‘‘सध्या महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मुसलमानांचे फतवे निघत आहेत. हिंदुस्थानात हिंदु धोक्यात आहेत. उद्धव ठाकरे मुस्लिम लीगची भाषा बोलत आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्रासाठी मोदीजींना बळ देण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद यांना मत देणे होय. मोदी, देश आणि हिंदु राष्ट्र यांना मत द्यावे.