भ्रमणभाषच्या दुकानातून ३९ लाख रुपये जप्त !

चार जणांना अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर साहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलीस यांनी पैठणगेट येथे भ्रमणभाषच्या दुकानावर धाड टाकून ३९ लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक यांना अटक केली. या ठिकाणी नोटा मोजण्याचे यंत्रही आढळून आले. संशयितांनी हवालासाठी ही रक्कम आणली होती.