… तरच सिंधुदुर्गचा ‘ग्रीन झोन’मध्ये समावेश होईल ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १४ एप्रिल या दिवशी सर्व उत्तरदायी अधिकार्‍यांनी कार्यालयात उपस्थित रहाणे आवश्यक होते; पण आतापर्यंत जे सेवेत रुजू झाले नाहीत, अशा अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाईल

‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावरील ‘ऑनलाईन सत्संगा’चा ६८० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सामाजिक माध्यमांद्वारे खोट्या लिंक प्रसारित, नागरिकांनी सावध रहावे ! – नवी मुंबई पोलीस

दळणवळण बंदीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा अपलाभ घेत काही समाजकंटकांनी खोट्या लिंक संकेतस्थळ, व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य प्रसारमाध्यमे यांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित करणे चालू केले आहे.

 महापालिकेचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रकाश थविल यांना कारणे दाखवा नोटीस

देहली येथून तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तींच्या अलगीकरणाकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रकाश थविल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

…तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला त्यागपत्र देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल ! – अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

राज्यघटनेच्या कलम १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहाण्यासाठी पदाची शपथ घेतल्यापासून ६ मासांच्या आत विधानसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य होणे आवश्यक आहे.

 मुंबईत एका दिवसात आढळले ५७ रुग्ण , राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१६

२ एप्रिलला सायंकाळपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१६ पर्यंत पोचली.

दाभोळ (दापोली) येथे सागरी पोलीस सतर्क : २५ पेक्षा अधिक युवकांचे पोलिसांना साहाय्य

कोरोनाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर दळणवळण बंदीचे आदेश शासनाने दिलेले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी दाभोळ सागरी पोलीस सतर्क झाले आहेत. या पोलिसांना दाभोळ पंचक्रोशीतील २५ पेक्षा अधिक युवक आणि ग्रामस्थ पोलीस मित्र बनवून सहकार्य करत आहेत.

वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना स्वस्त धान्य उपलब्ध

या योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकर्‍यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या ३ मासांकरिता सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ प्रतिव्यक्ती ५ किलो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.