महापालिकेचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रकाश थविल यांना कारणे दाखवा नोटीस

तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्यांच्या अलगीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकरण

नागरिकांच्या जिवाच्या दृष्टीने संवेदनशील असणार्‍या विषयात निष्काळजीपणा होणे अपेक्षितच नाही. अशा दायित्वशून्य अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी केल्यास चूक ते काय ?

नाशिक – देहली येथून तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून परतलेल्या व्यक्तींच्या अलगीकरणाकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) प्रकाश थविल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. थविल यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील कोरोना संशयितांच्या अलगीकरणाची व्यवस्था करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते.  तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून आपापल्या शहरात परतलेल्या व्यक्तींचे अलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची माहिती थविल यांना देण्यात आली होती. संबंधितांचे अलगीकरण करून त्याची माहिती आयुक्तांना देणे आवश्यक होते; परंतु दिवसभरात ३ वेळा विचारणा करूनही थविल यांनी माहिती दिली नाही. माहिती देण्याऐवजी घरी गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.