पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेतांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बडगे यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन.

मुंबई महापालिकेच्या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अन्य राज्यांतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

‘थर्टी फर्स्ट’ रात्री पावणे अकरापर्यंतच साजरे करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातही नवीन वर्ष गुढीपाडव्याऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे !

प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी शासन १०१ कोटी रुपयांची तरतूद करणार

राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवंर्धन यांसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यास संमती देण्यात आली होती.

आर्थिक अपहाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करीन ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आर्थिक घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की, पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सिद्ध रहा, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

अर्णव गोस्वामी यांच्याकडून पैसे मिळाल्याची ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दासगुप्ता यांनी स्वीकृती दिल्याची पोलिसांकडून माहिती

रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी ६ वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी पैसे दिल्याची स्वीकृती भारत ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बॉर्क)चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद

नियमबाह्य कामांसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केल्याची तक्रार सदर बझार पोलीस ठाणे येथे प्रविष्ट करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक दायित्व स्वीकारून त्यागपत्र द्यावे ! – धीरज सूर्यवंशी, शहर युवा मोर्चा अध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर संभाजीनगर येथे बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक दायित्व स्वीकारून तात्काळ त्यागपत्र द्यावे…

सौ. वर्षा राऊत यांना अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाची दुसरी नोटीस

हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक यांतील यांमधील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.