रणजित डिसले यांची राज्यपाल नियुक्त जागेवर शिफारस करणार ! – प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

रणजित डिसले

सोलापूर, ५ डिसेंबर – युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईझ’ हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले यांना घोषित झाला आहे. आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शी येथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या १२ जागांपैकी एका जागेसाठी शिफारस करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी डिसले यांची आहे. राज्याच्या विधीमंडळात डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहे. नुकत्याच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाली. यात शिक्षक नसलेली व्यक्ती ‘शिक्षक आमदार’ होतो, हे या देशाचे दुर्दैव आहे.’’