हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण 

बक्षीस वितरण प्रसंगी विविध मान्यवर आणि सहभागी मुले

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) – भुईकोट किल्ला येथे हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच घेण्यात आला. या समुहाचे किल्ला स्पर्धा घेण्याचे हे १३ वे वर्ष आहे. लहान गट आणि मोठा गट याप्रमाणे किल्ला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्‍वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले. स्पर्धेची सर्व सन्मान चिन्हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख कै. जयवंतराव देशमुख (अप्पा) यांच्या स्मरणार्थ देण्यात आली.

या वेळी ज्येष्ठ शिवव्याख्याते प्राचार्य अरुण घोडके (सर), रुग्णसेवक विकास कापसे, कुमार गायकवाड (बाबा), शिवसेनेचे नीलेश आवटे, पृथ्वीराज देशमुख, अजय जाधव, प्रमोद पवार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार आवटे, रोहित गायकवाड, रोहन म्हेत्रे, श्रीराम गरगटे, ओंकार जोशी, विक्रांत पवार, आदित्य भोगावकर, चिंतामणी कुंभार, शिवम् शेटे आदींनी केले.