तळोजा येथे आग विझवतांना अग्नीशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

नवी मुंबई – तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या जवानाचा ४ डिसेंबरच्या रात्री गुदमरून मृत्यू झाला. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून ते अंबरनाथ औद्योगिक अग्नीशमन केंद्रात ‘फायरमन’ या पदावर कार्यरत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना ११ घंट्यांहून अधिक वेळ लागला. रासायनिक पदार्थांच्या धुरामुळे ५ जवानांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एम्.जी.एम्. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.