हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

हिंदु धर्माचा अवमान करणे, देवतांचे विडंबन, साधू-संतांच्या हत्या यांच्या विरोधात कठोर कायदा केंद्र आणि राज्य येथे पारित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांनी केली आहे.

‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापून त्यांचा अवमान !

हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्‍यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !

कर्नाटकमधील भाजप सरकार गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘कर्नाटकातील इंचभरही भूमी देणार नाही !’

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेली ६० वर्षे चालू असून तो सामोपचाराने सोडवण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारचे विधान करणे संतापजनक आहे, हे येडियुरप्पा यांनी लक्षात घ्यायला हवे !

आत्मनिर्भरतेच्या बळावर भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करणार ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन

रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !

अल्पवयीन मुलीला ‘हिंदु’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.

हुबळी मार्गे जाणार्‍या १९ रेल्वे गाड्या रहित

नैऋत्य रेल्वे विभागातील असणार्‍या हुबळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने वेगवेगळ्या दिवशी एकूण १९ रेल्वे गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.

कोडगुवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंद

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या काँग्रेसी नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

कर्नाटकमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या स्वजातीतील पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला मिळणार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

‘आता धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी मुसलमान महिलांनाही अशा प्रकारचे साहाय्य द्यावे’, अशी मागणी तथाकथित निधर्मी राजकीय पक्ष, संघटनांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !