प्रेषित महंमदचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांना अटक !

अटक करण्यात आलेले आरोपी

यादगीर (कर्नाटक) –  सामाजिक माध्यमांद्वारे प्रेषित महंमद यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारे महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांना कर्नाटकातील यादगीर शहर पोलिसांनी अटक केली. महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला. (हिंदूबहुल भारतात स्वत:ला अल्पसंख्य म्हणवणारे मुसलमान अशा उघड धमक्या देतात आणि ‘भारतात अल्पसंख्यांकांचे अस्तित्व धोक्यात’ अशी ओरड करणारे निधर्मीवादी आणि साम्यवादी याविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)  

हट्टिकुणी, यादगीर येथील रहिवासी असलेले महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीसह इतर हिंदु संघटनांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक सी.बी. वेदमूर्ती यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, आरोपींनी सामाजिक माध्यमांवर त्यांच्या समुदायातील सदस्यांना भडकावण्यासाठी प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित केला होता. आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (दंगली भडकावण्यासाठी इतरांना चिथावणी देणे) आदी कलमांद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.