पत्नीने पतीला ‘काळा’ म्हणत अपमानित करणे ही क्रूरता ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू – कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले आहे की, पत्नीने पतीला काळा म्हणत त्याचा अपमान करणे ही क्रूरता आहे. या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकतो, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली.

या जोडप्याने वर्ष २००७ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी आहे. पतीने वर्ष २०१२ मध्ये बेंगळुरू येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका केली होती. वर्ष २०१७ मध्ये न्यायालयाने याचिका फेटाळली होती. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली हेाती. तेथे न्यायालयाने घटस्फोटाला संमती दिली.